Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील व्यापारी दुकाने उघडण्यासाठी आग्रही

दुकानदारांकडून नियम पाळण्याची ग्वाही

मुंबई : राज्य सरकारच्या कठोर निर्बंधांमुळे व्यापारी आणि आर्थिक वर्तुळामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आधीच्या प्रदीर्घ लॉक डाऊनच्या दुष्टचक्रातून अर्थकारण सावरत असताना आता आणखी २५ दिवस दुकाने बंद ठेवणे व्यापाऱ्यांना परवडण्याजोगे नाही. त्यामुळे 'माझा व्यवसाय, माझी जबाबदारी' या भूमिकेतून आम्ही नियम पाळू. त्यामुळे आम्हाला दुकाने उघडू द्या, अशी भूमिका राज्यभरातील व्यापारी आणि उद्योजकांनी घेतली आहे. 

आता पुन्हा व्यवसाय बंद झाला तर बँकांचे हफ्ते, वीज बिल, कामगारांचे वेतन व दुकानाचे भाडे भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून, अशा व्यथा दुकानदारांकडून मांडल्या जात आहेत. 

कंदिवलीतील दुकानदारांनी बुधवारी राज्य सरकारच्या नव्या निर्बंधांविरोधात आंदोलन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या