Ticker

6/recent/ticker-posts

‘ब्रेक द चेन’ च्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा.

मुंबई :  ‘ब्रेक द चेन’ (Break The Chain) बाबत मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेतला. 

या वेळी गृह  (विशेष), प्रधान सचिव विनीत अग्रवाल, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगळ उपस्थित होते. 

गृह राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले,  संचारबंदी व जमावबंदी यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, जाणीवपूर्वक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यां व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करावी. विविध संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व व्यक्ती  यांना या प्रक्रियेबाबत सहकार्य करण्याबाबतची विनंती करण्यात यावी. याउपरही विरोध होत असल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. असे निर्देशही श्री. देसाई यांनी यावेळी दिले.  

येत्या काळात रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, गुढीपाडवा हे सण साजरे करत असतांना शासन आदेशाचे करण्यात यावे. तसेच वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला यशस्वीपणे पायबंद  घालण्यासाठी पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी, शासन आदेशात नमुद केलेल्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु राहतील त्या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही  श्री. देसाई यांनी केले. 

कोकणचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. संजय मोहिते, नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. प्रताप दिगावकर, औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. के. एम. प्रसन्ना, नागपूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. चिरंजीव प्रसाद, विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेडचे श्री. निसार तांबोळी, कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक  श्री. मनोज लोहीया, विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावतीचे श्री. सि. के. मिना व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या