दि. ०५ एप्रिल रोजी ५१ डॉक्टरांसह एकूण २३६ आरोग्यकर्मी महानगरपालिकेस मिळाले असून आज सलग दुस-या दिवशीही महापालिका मुख्यालय आणि विष्णुदास भावे नाट्यगृह याठिकाणी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली. आजच्या दिवशीही ५१ डॉक्टर्स, २०५ स्टाफनर्स, २१ ऑक्झिलरी नर्स तसेच ५ लॅब टेक्निशियन व २ ज्युनियर लॅब टेक्निशियन भरतीसाठी पात्र ठरलेले आहेत. सातत्याने दोन दिवस आरोग्य विभागासाठी प्रतिमहा ठोक मानधनावर कंत्राटी (करार) पध्दतीने भरती प्रक्रियेस चांगला प्रतिसाद मिळालेला असून उद्याही ही प्रक्रिया सुरु असणार आहे.


0 टिप्पण्या