व्यापाऱ्यांची राज्य सरकारविरोधात निदर्शने
मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याच्या सरकारच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. कडक निर्बंधांमुळे जनमानसात अस्वस्थता पसरली आहे. प्रशासनाच्या विनंतीनंतर प्रसंगी इशाऱ्यानंतर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी सकाळी उघडलेली दुकाने दुपारनंतर बंद केली. राज्यात अनेक ठिकाणी व्यापारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात वादही झाला. मंगळवारी दादर व्यापारी संघाने आपल्या दुकानांवर निषेधाचा फलक लावत नाराजी व्यक्त केली.





0 टिप्पण्या