आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्या

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

मुंबई :   कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्वपूर्ण टप्पा १ मे पासून सुरू होणार असून १८ वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर ६० दिवस आपणास रक्तदान करता येत नाही, त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे,  असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. 

श्री.  वडेट्टीवार म्हणाले, आता रुग्णालयांमध्ये कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्‍यकता भासत आहे. त्यातच कोरोना लस घेतल्यावर ६० दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्या त्यासाठी २८ एप्रिल नंतर cowin.gov.in. या अधिकृत संकेतस्थाळावर ऑनलाइन नोंदणी करा.  कोरोनामुळे मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  रक्ताचा तुटवडा पाहून  सामाजिक भान जपून  रक्तदान करा. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता येईल, असे आवाहन श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज