Ticker

6/recent/ticker-posts

वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी कठोर निर्बंध

रेस्टॉरंट, बार, सिनेमागृहे, समुद्रकिनारे, चौपाटी रात्री ८ वाजल्यानंतर बंद

मुंबई, दादासाहेब येंधे :  राज्यात पुन्हा एकदा झपाट्याने वाढणारी कोविड-१९ रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने नव्या गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार शनिवार, २७ मार्च पासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.  या कालावधीत ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी असणार आहे.

उद्याने, समुद्रकिनारे, मॉल, सर्व सिनेमागृहे, रेस्टॉरंट देखील या वेळेत बंद राहणार आहेत. फक्त रेस्टॉरंटमध्ये या कालावधीत पार्सल व होम डिलिव्हरी सेवा सुरू राहतील. या नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजाराचा दंड तसेच मास्कशिवाय आढळल्यास ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. जमावबंदीचे हे आदेश १५ एप्रिल पर्यंत लागू असणार आहेत.

राज्य सरकारने कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता नवीन नियमावली जारी केली आहे. सगळ्या प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी देखील ५० व्यक्तींचेच निर्बंध घालण्यात आले आहेत. अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी २० व्यक्तींनाच परवानगी असणार आहे.  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या