Ticker

6/recent/ticker-posts

अलिबाग तालुक्यातील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट एक महिन्यात करणार - आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

 विधानसभा अधिवे प्रश्नोत्तरे :

मुंबई : अलिबाग तालुक्यातील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट एक महिन्याच्या आत करण्यात येईल, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य प्रशांत ठाकूर यांनी अलिबाग तालुक्यातील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, या रुग्णालयाच्या आंतररुग्ण इमारतीच्या रॅम्पला लोखंडी खांबाचे टेकू लावले आहे. त्याची पुर्नबांधणी करण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक जिल्हा शल्य चिकित्सकांना प्राप्त झाले असून ते जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी सादर केले आहे.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान एका उपप्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व जिल्हा रुग्णलयांचा आढावा घेऊन त्यांची तपासणी केली जाईल. त्यात ज्या त्रुटी आढळतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील,असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रवींद्र वायकर,अतुल भातखळकर, वैभव नाईक, श्रीमती सिमा हिरे यांनी भाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या