जोडीदार निर्व्यसनीच निवडा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

जोडीदार निर्व्यसनीच निवडा

व्हॅलेन्टाईन डे निमित्त नशाबंदी मंडळाचे आवाहन

मुंबई, दादासाहेब येंधे : मन व शरीराचे सुंदर बंध म्हणजे प्रेम; तर व्यसने आधारपोटी कवटाळली जातात; परंतु व्यसन हे कधीही आधार होऊ शकत नाही. त्यामुळे ज्या व्यक्ती व्यसनांना आधार मानतात, त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा भक्कम आधार हळूहळू ढासळतो. त्यामुळे जोडीदार हा निर्व्यसनीच निवडा, असे आवाहन शनिवारी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले. 

नरिमन पॉईंट येथे नशाबंदी मंडळातर्फे अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी जोडीदार मज निर्व्यसनीच हवा' अशा संदेशाचे फलक घेत घोड्यावर स्वार वधू-वराने व्यसनमुक्तीचा प्रचार केला.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज