प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिध्द - 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती, सूचना दाखल करण्याची मुदत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिध्द - 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती, सूचना दाखल करण्याची मुदत

सार्वत्रिक निवडणूक - २०२१
 
प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिध्द - २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती, 
सूचना दाखल करण्याची मुदत
 
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे दि. २ फेब्रुवारी २०२१ चे पत्र क्र.रानिआ-मनपा-२०२०/प्रक्र.3/का.५, दि. ०२ फेब्रुवारी २०२१ नुसार अन्वये नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२१ मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
मा. राज्य निवडणूक आयोगाच्या कालबध्द कार्यक्रमानुसार दिनांक १६/०२/२०२१ रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी महानगरपालिका मुख्यालय व संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर नागरिकांकडून हरकती व सूचना दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ ते २३ फेब्रुवारी २०२१ (सार्वजनिक सुट्टीसह) या कालावधीत कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
हरकती व सूचनेचा प्रारूप नमुना www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.  नवी मुंबई महानगरपालिकेने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या विहीत नमुन्यातच हरकती व सूचना सादर करण्यात याव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील निर्देशानुसार प्रारूप मतदार यादीवर प्रभागनिहाय खालील प्रमाणे हरकती व सूचना स्विकारल्या जातील.
१.      लेखनिकांच्या काही चुका.
२.      दुस-या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले.
              
तरी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील निवडणूक विभाग कार्यालय व संबंधित विभाग कार्यालय या ठिकाणी विहीत नमुन्यात समक्ष सादर केलेल्याच हरकती व सूचना स्विकारल्या जातील याची नोंद घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

३.      संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही, महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे.

































प्रेस नोट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज