बर्ड फ्ल्यू आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत महत्वपूर्ण सूचना
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांतील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्ल्यू या आजाराचा विषाणू आढळल्याचे प्रयोगशाळा तपासणीमध्ये निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी आरोग्य विभागामार्फत महत्वपूर्ण सूचना देण्यात येत आहेत.
(1) नागरिकांना आपल्या परिसरामध्ये कोंबडया, कावळा, कबुतर, किंवा इतर पक्षी मृत अवस्थेत आढळल्यास त्याची माहिती त्वरीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाला टोल फ्री क्रमांक 1800222309 / 2310 यावर कळविण्यात यावी.
(2) महानगरपालिकेकडे प्राप्त माहितीनुसार सदर मृत पक्षाची योग्य रितीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल.
(3) आजारी पक्षी यांच्याबरोबरचा संपर्क टाळावा.
(4) जर कोणत्याही व्यक्तीमध्ये घसा खवखवणे, ताप येणे, सर्दी-खोकला अशा प्रकारची इन्फ्ल्युएन्झा सदृश्य लक्षणे (Influenza like illness (ILI) आढळल्यास त्वरीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी.
(5) मांस व अंडी खाताना व्यवस्थित शिजवून खाल्याने कोणताही धोका उद्भवणार नाही याची नोंद घ्यावी.
तरी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन आपल्या घरी सर्वेक्षण भेटी करता येणा-या नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य ती सत्य माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रेस नोट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा