रेझिंग डे' सप्ताहानिमित्त जनजागृती - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

रेझिंग डे' सप्ताहानिमित्त जनजागृती

कोरोना बाबत मेगाफोनद्वारे जनजागृती

मुंबई, दादासाहेब येंधे : सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांतर्फे नुकताच 'रेझिंग डे सप्ताह' साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती. 

०२ जानेवारी २०२१ रोजी पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने काल  ०६ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यासमोरील लोकल लाईन, मेन लाईन, जनरल हॉल व  मा. डीआरएम ऑफिस समोरील परिसरात विझिबल पोलिसिंग करून रेल्वे प्रवाशांना मेगा फोनद्वारे कोविड-१९ च्या सुरक्षिततेच्या विषयी कोणती व कशी दक्षता घ्यायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

सदर मार्गदर्शक सुचनांमध्ये मास्क व्यवस्थित लावणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे, हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुणे या बाबतचे आवाहन रेल्वे प्रवाशांना सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच भित्तीपत्रके देखील पोलीस ठाणे व सीएसएमटी रेल्वे स्टेशन परिसरात चिटकवण्यात आली.             

प्रसंगी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत, पोलीस निरीक्षक भगवान डांगे, पोलीस उप निरीक्षक ज्योती मदकट्टे तसेच पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    



                         








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज