मुंबई, दादासाहेब येंधे : पश्चिम रेल्वेवर पहिल्यांदाच तीन महिला कर्मचाऱ्यांनी वसई रोड ते वलसाड दरम्यान मालगाडी चालवली. मंगळवारी ही मालगाडी वळसद करिता रवाना करण्यात आली.
भारतीय रेल्वेत
विविध पदांवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.
लोको पायलट आणि गार्डला मालगाड्या चालवताना घरापासून दूर विविध शहरात जावे लागते.
परिणामी, या पदावर काम करणाऱ्या महिलांची संख्याही
हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित
ठाकूर यांनी सांगितले की, महिलांच्या क्रूने मालगाडी चालवण्याची ही पहिलीच
वेळ आहे. या मालगाडीला कुमकुम डोंगरे
यांनी सहाय्यक लोको पायलट उदिती वर्मा यांच्या मदतीने चालवली. तर गार्डचे काम आकांक्षा यांनी केले. त्यांनी चार वर्षापासून सहाय्यक
लोको पायलट म्हणून काम केल्यानंतर आता लोको पायलट म्हणून प्रथमच मालगाडी चालवली. जबलपूर
येथून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या कुमकुम डोंगरे यांनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये मास्टर्स केले
आहे. एमबीए केलेल्या आकांक्षा राय या पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात एकमेव महिला गार्ड आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा