बॉलिवूड कलाकार, उद्योगपती आहेत त्याच्या पानाचे शौकीन
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाचा
सहमालक रामकुमार तिवारी याला चौकशीनंतर एनसीबी'ने मंगळवारी अटक केली. अमली पदार्थांच्या प्रकरणात त्याचा सहभाग निश्चित झाल्यानंतर ही कारवाई
करण्यात आली. तिवारी हा मुच्छड पानवाला दुकानाचा सहमालक असून
त्याचे दुकान दक्षिण मुंबईतील केम्स कॉर्नर मध्ये आहे. या
दुकानातील पान खाण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसह मुंबईतील मोठे उद्योगपती
देखील येतात. यामुळे आता ड्रग्स कनेक्शनमध्ये
आणखी मोठ्या नावांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा