मुंबई : साकीनाका येथील खैरानी रोडवर असलेल्या न्यु इंडिया लिमिटेड केमिकल कारखान्याच्या गोदामाला मंगळवारी, सकाळी साडेदहाच्या सुमारास मोठी आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अर्ध्या तासात अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत सदर कारखान्यातील तीन कामगार ४० टक्के भाजले आहेत. जेथे आग लागली होती त्या ठिकाणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या कंपन्या, गोदाम, दुकाने यांनी अग्निसुरक्षा यंत्रणेबाबतची काळजी घेतली पाहिजे. या आगीत जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.
फोटो : साकीनाका येथील खैरानी रोडवर कारखान्याला लागलेली आग नियंत्रणात आणताना मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा