Ticker

6/recent/ticker-posts

वांद्र्यात एमडीचा साठा हस्तगत; महिलेसह तिघांच्या मुसक्या आवळल्या

मुंबई, दादासाहेब येंधे : वांद्रे पश्चिम येथील कुरेशी नगर मैदान परिसरात वांद्रे पोलिसांनी कारवाई करत १४ ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला. सदर अंमली पदार्थाची किंमत सुमारे दोन लाख १० हजार रुपये असून, याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.१५ वाजता करण्यात आली. 


वांद्रे पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक एस. ह्री. रोड परिसरात गस्त घालत असताना कुरेशी नगर मैदानाजवळ कलीम शमीम शेख (वय, ३२) यांच्याजवळ १४ ग्रॅम एमडी आढळून आले. पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा कुरेशी नगर मैदान परिसरातून २ लाख किंमत असलेले १४ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून कलीम शेख याला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत कलीमने निलोफर सँडोले (४०) आणि तिचा साथीदार फिरोज शेख उर्फ फिरोज चिकना (वय, ६१) यांच्यासोबत संगनमताने अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी वांद्रे परिसरात शोध घेऊन निलोफर सँडोले आणि फिरोज शेख यांनाही अटक केली.

सदरची कारवाई मा. श्री. अभिनव देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. श्री. डॉ. मोहित कुमार गर्ग, पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ-२, मुंबई, मा. श्री. अधिकराव पोळ, सहा. पोलीस आयुक्त, वांद्रे विभाग, मुंबई यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली वांद्रे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र साबूखे, पोलीस निरीक्षक अजय लिंगनूरकर तसेच वांद्रे पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सपोनि राजेंद्र नांगरे व पो.ह.क्र.०३९९६६/ माने, पो.ह.क्र.०८.९३६०/ वाणी, पो.ह.०८.९७०९/भोगले व पो.ह. ०९.०९३३/गुरुव यांनी पार पाडली असून गुन्ह्याचा पुढील तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राजेंद्र नांगरे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या