मुंबई, दि. २० : जीवन प्रबोधिनी ट्रस्ट यांच्या कडून घडवू जीवन करु प्रबोधन ही संकल्पना घेऊन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वांगणी तालुक्यातील धारोळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे (बॅग, वह्या, कंपास, ड्रॉइंग कलर, सँडल, खाऊ, झाडे) वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक सत्यवान नर, अध्यक्ष - अमित पवार, सरचिटणीस - हेमंत मकवाना, खजिनदार - गणेश क्षीरसागर, संयोजक - गणेश पार्टे, मिडिया संयोजक - रविंद्र जाधव व शाळेचे मुख्याध्यापक - बळवंत शेवाळे, उपशिक्षक - शैलेश बिरादार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष - अविनाश घुटे, काराव ग्राम पंचायत उपसरपंच - नंदू शेंडे, अंगणवाडी सेविका - हर्षदा ठाकरे व समस्त ग्राम पंचायत आणि जीवन प्रबोधिनी ट्रस्ट चे सर्व ज्येष्ठ सल्लागार आणि आधारिका फाउंडेशन चे विनायक मोरे व सर्व सदस्य व हितचिंतक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी व ग्रामपंचायतीच्या लोकांनी संस्थेचे आभार मानले.
Photo : viral
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा