मुंबई, दि. २२ : काल जागतिक योग दिनानिमित्त मुबंईत ठिकठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, सरकारी कार्यालयांमध्ये योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या स्थानकांत योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. सायन ते सीएसएमटी लोकलमध्ये देखील योगाचे धडे गिरवण्यात आले. यासाठी ७५ योग शिक्षकांनी काम केले.
पश्चिम आणि मध्य रेल्वेने हिल स्टेशन या संस्थेच्या मदतीने लोकल ट्रेनमध्ये योग दिवस साजरा केला. दादर ते चर्चगेट आणि मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली दरम्यान रुचिता शाह आणि त्यांच्या टीमने लोकलमध्ये प्रवाशांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यांनी रेलवे सुरक्षा दल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सोपी आणि सहज करता येणारी योगासने सादर केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा