आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १८ जून, २०२२

demo-image

आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दहावी उत्तीर्णांचे अभिनंदन, पुढच्या वाटचालीस शुभेच्छा


मुंबई, दि. १८ : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 

" शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहे, या यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि डोळसपणे पावले टाका. अभ्यासात मेहनतीची तयारी ठेवा, यश निश्चितच मिळेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!"असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. 


1829

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *