नामांकित कंपनीचे बनावट टोनर जप्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

नामांकित कंपनीचे बनावट टोनर जप्त

 मुंबई, दादासाहेब येंधे : नामांकित बनावट कंपनीचा टोनर बनवून विदेशात निर्यात करण्याचा गोरखधंदा करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट-१० च्या पोलिस पथकाने अटक केली. 

गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोतीलाल नगर क्रमांक २ येथे पोलिसांनी छापा टाकून सुमारे दोन कोटी ७१ लाख ५० हजार ८१९ रुपयांचा नामांकित कंपनीचा बनावट टोनर, आऊटर बॉक्स, प्लस्टिक बॅग, स्टिकर तसेच एक संगणक आणि थर्मल प्रिंटर असा असा मुद्देमाल जप्त केला आहे. 

गुन्हे शाखा युनिट-२० च्या पथकाने आरोपीकडे चौकशी केली असता, त्याच्या विरोधात यापूर्वी माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. आरोपीकडे केलेल्या प्राथमिक तपासात आरोपी हा नामांकित कंपन्यांचे बनावट टोनर नोंदणी करून बेल्जियम, जर्मनी, स्पेन, इंग्लंड येथील मागणी नोंदवणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर पुरवठा करत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज