रिक्षा चोरी प्रकरणात सराईत गुन्हेगारास मालाड मधून अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

demo-image

रिक्षा चोरी प्रकरणात सराईत गुन्हेगारास मालाड मधून अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : नोकरी गेल्याने रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. जसबंत राय असे त्याचे नाव असून तो सार्वजनिक शौचालयात जाणाऱ्या चालकांच्या रिक्षा घेऊन पळून जात होता. त्याने आत्तापर्यंत खार, सांताक्रूझ आणि मालाड परिसरातून शिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून सहा लाख रुपयांच्या चोरीच्या सहा रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

जगदंबाप्रसाद दुबे (वय,६४ राहणार मालाड) रिक्षाचालक आहेत. २५ जुलै रोजी ते मालाड येथील एस. व्ही. रोडवर आले असता रिक्षा पार्क करून तेथील शौचालयात गेले. त्यावेळी त्यांनी त्यांची रिक्षा तिथेच पार्क केली होती. बाहेर आल्यानंतर त्यांना त्यांची रिक्षा दिसली नाही. रिक्षा चोरीस गेल्याची खात्री होताच त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या पथकाने तपासात लिबर्टी गार्डन येथून जसबंतला ताब्यात घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *