सी.एस.टी परिसरात अपहरण करून निर्घृणरित्या खुन करणाऱ्या आरोपींना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, २२ जून, २०२१

सी.एस.टी परिसरात अपहरण करून निर्घृणरित्या खुन करणाऱ्या आरोपींना अटक

सी.एस. एम. टी. परिसरात अपहरण करून निर्घृणरित्या खुन करणाऱ्या आरोपींना अटक

प्रेमसंबध असल्याचे संशयावरून अपहरण करून खून

मुंबई, दादासाहेब येंधे : १६ मे २०२१ रोजी ओशीवरा पोलीस ठाणेस एक तरूण युवक हरविलेबाबत  तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणात कक्ष कार्यालयाकडून समांतर तपास करण्यात येत असताना तांत्रिक गोपनीय माहितीद्दारे प्र.पो.निरक्षक घनश्याम नायर यांना असे आढळुन आले की, यातील हरविलेल्या व्यक्तीचे काही इसमांनी खून करण्याच्या उददेशाने अपहरण केलेले आहे. त्यावरून ओशीवरा पोलीस ठाणे येथे हरविलेल्या व्यक्तीच्या अपहरणाचा गुन्हा नोंद करून तो आझाद मैदान पोलीस ठाणेस वर्ग करण्यात आलातेथून सदरचा गुन्हा हा कक्ष कडे तपासावर घेण्यात आला त्यानंतर अपहरण करणारे संशयीत व्यक्ती हे बिहार तसेच कर्नाटक राज्यात पळून गेल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने त्यांचा शोध घेण्याकरीता दोन वेगवेगळी पथके तयार करून बिहार कर्नाटक येथे पाठविण्यात आली. नमूद पथकांनी बिहार येथून ०३  कर्नाटक येथून ० आरोपीस ताब्यात घेवून नमूद गुन्हयात अटक केली

सदर आरोपीकडे केलेल्या चौकशीत असे निष्पन्न झाले की, मूळचा बिहारचा असलेल्या तरुणाची त्याच्या गावच्या व्यक्तीने अनैतिक संबंधातून निर्घृण हत्या केली. सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यात घणाचे घाव घातले. मग गळा चिरला. दुसऱ्या मजल्यावरून त्याला खाली फेकून मग मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये टाकला.

राजेश चौपाल (वय २३) हा मूळचा बिहारचा असलेला तरुण वडिलांसोबत ओशिवरा येथे राहत होता. परंतु, लॉक डाऊनमुळे तो गेल्या वर्षभर गावी गेला होता. तेथे त्याचे गावातल्याच सुरेंद्र मंडल (वय ३०) याच्या पत्नीसोबत सूत जुळले आणि त्याचा पूर्ण गावात गाजावाजा झाला. हे प्रकरण समजताच सुरेंद्रच्या तळपायाची आग मस्तकात गेली व त्याने राजेशला कायमचा संपवायचा चंग बांधला. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे राजेशने त्याच्या गावचे दोघे भाऊ शंभू सहाय आणि राजकुमार सहाय तसेच विजय सरफे अशा तिघांना सोबतीला घेऊन १६ जून रोजी बिहार वरून मुंबईला यायला निघाला पण गावची ट्रेन कुर्ला स्थानकात आली तरी राजेश काही घरी पोहोचला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. 

आरोपी सुरेश याने राजेशला भेटायला सीएसएमटी रेल्वे स्थानक येथे भेटायला बोलावले होते. त्यामुळे कुर्ला टर्मिनसला उतरल्यानंतर राजेश टॅक्सीने सीएसएमटी येथे गेला. तेथे पोहोचल्यावर आरोपींनी त्याचे अपहरण करून त्यास ते काम करीत असलेल्या सी.एस.टी. रेल्वे स्टेशन परिसरातील अकबर अली ट्रॅव्हल्स समोरील बांधकाम साईटच्या दुसऱ्या मजल्यावर घेवून गेले. सदर ठिकाणी आरोपींनी  अपहृत व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी घनाने मारून गंभीर जखमी केले, त्यानंतर त्याचा अमानूषपणे गळा आवळून चाकू ने गळा चिरून निर्घुणतेने खुन करून मृतदेह दुसऱ्या माळयावरून तळमजल्यावर फेकला

त्यानंतर मृतदेह कोणास मिळून येवू नये म्हणून नमूद बांधकाम साईटच्या तळमजल्यावरील बऱ्याच वर्षापासुन बंद असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकला सदर मृतदेह गळून जावून पुरावा नष्ट व्हावा या उददेशाने त्यावर २५ किलो मीठ ओतून पाण्याची टाकी बंद करून आरोपी हे आपआपल्या मूळगावी पळून गेले

तपासात निष्पन्न झालेल्या माहितीच्या आधारे आरोपी काम करत असलेल्या बांधकाम साईटवरील पाण्याच्या बंद टाकीतून अपहृत व्यक्तीचा मृतदेह (हाडांचा सांगाडा) बाहेर काढण्यात आला असून त्याचे शवविच्छेदन जे.जे. रूग्णालय, मुंबई येथे करण्यात आले आहे. अशाप्रकारे एक महिन्यापासून मिसींग असलेल्या इसमाचा कोणत्याही प्रकारे सुगावा लागत नसताना तांत्रिक गोपनीय माहितीच्या आधारे कक्ष यांनी अथक परिश्रम घेवून मिसींग झालेल्या इसमाचा निर्घुनतेने खून झाल्याचे निष्पन्न करून गुन्हयाची उकल केलेली आहे. सदर घटना हॉर्नबी बिल्डिंग, केमको बिल्डिंग शेजारी, डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई येथे घडली आहे. 

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक् (गुन्हे), मुंबई, श्री. मिलींद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. एस. विरेश प्रभू, मा. पो. उप आयुक्त (प्रकटीकरण), श्री. प्रकाश जाधव, मासहा. पो. आयुक् (मध्य), गु.प्र.शा., गु..वि., श्री. नितीन अलकनुरे, मा. सहा. पो. आयुक् (दक्षिण), गुप्र.शा., गु..वि., श्री. सोपान निघोट, यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष चे प्र.पो.नि. घनश्याम नायर, पो.निसदानंद येरेकर, .पो.नि. मोहिनी लोखंडे, .पो.नि. संजय जगताप, .पो.नि. गणेश जाधव, .पो.निअमोल माळी, .पो.नि. महेंद्र पाटील, .पो.नि. जयदीप जाधव, पो..नि. चिंचोलकर, .फौ. यादवसोनहिवरे, न्यायनिर्गुणे, पो..राणे, वायंगणकर, पैगंणकर, देसाई, घाडगे, वाबळे, शिरसाठ, विचारेवैंगुर्लकर, पो.ना.घागरे, सिंग, जावळे, .पो.ना. शिंदे, साळवी, पो.शि. फुंदे, काळे, मुलानी तसेच .फौचालक/घोरपडे, मालुसरे पो.ना. काबंळे यांनी केली आहे. अशी माहिती कळविली आहे.














प्रेस नोट


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज