५० हजारांपार जात ऐतिहासिक स्तराला स्पर्श
मुंबई, दादासाहेब येंधे : स्त्रांतर्गत व्यवहारांत
५० हजारांचा टप्पा ओलांडून मुंबई शेअर बाजाराच्या
निर्देशांकाने सेन्सेक्सने गुरुवारी नवा इतिहास घडवला. अर्थतज्ज्ञ,
बाजार विश्लेषक आणि गुंतवणूकदार यांच्या कल्पनेपलीकडे
दमदार वाटचाल करत सेन्सेक्स बाजार उघडताना ५०,०४७.६७ या पातळीवर गेला होता. दिवसभरात तो ५०,१२५.४३ या सर्वोच्च पातळीवरही गेला होता. मात्र, बाजार बंद होताना सेन्सेक्स १६७.३६ अंकांनी घसरत ४९,६२४.७६ या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५४.३५ अंकांनी खाली येत १४,५९०.३५ वर स्थिरावला. दुपारी दोन वाजेपर्यंत सेन्सेक्स ५० हजारांपारच होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा