डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून केली हत्या
मालवणी येथील घटना, आरोपींना अटक
मुंबई, दि. ३१ : मालवणीत एका टोळक्याने दगड बांबू आणि बॅटने मारहाण करत ४५ वर्षीय एजाज अब्दुल बसार शेख यांची हत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून मालवणी पोलीसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना अटक केली आहे.
शेख हा बांबूवाडी येथील रहिवासी आहे. बुधवारी आरोपींनी शेखला वाटेत अडवून मुख्य आरोपी मन्सूर सिद्दीचा रस्ता का आडवत असल्याचे विचारून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावर शेख यांनी आपण कोणाचाही रस्ता अडवला नसल्याचे सांगितले. यातूनच शिवीगाळ करत शेखच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून जखमी केले. अन्य सहकाऱ्यांनी बांबू आणि बॅटने शेखला मारहाण केली. यावेळी आरोपींनी शेख यांचा मुलगा आमिरुद्दीन शेख यालाही ठार मारण्याची धमकी दिली. आरोपी धमकावत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
हत्येनंतर पोलिसांनी या परिसरात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीच्या दहशतीमुळे कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दोन तासांत साबीर बाबू अन्सारी (वय, ४८) अकबर अमीन हसन अन्सारी (वय, ४२) रेश्मा मनसूद सय्यद उर्फ सीटी (वय,३०) व यास्मिन तौहीन खान (वय, ३१) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर आरोपींचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट होताच त्यांच्यावर कारवाई केली आहे.

Press note
लेबल: क्राईम
0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ