Ticker

6/recent/ticker-posts

सिद्धिविनायकाच्या भक्तांना फसवणाऱ्याला बेडया

पूजेच्या नावाने ऑनलाईन फसवणूक


मुंबई, दादासाहेब येंधे : सिद्धिविनायकाच्या ऑनलाईन पूजेसह घरपोच प्रसाद देण्याच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या चार पैकी एका आरोपीला कोलकत्याहून मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. सुपोनॉ प्रदीप सरकार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू असून इतर तीन आरोपींनाही अटक करण्यात येणार आहे.


सिद्धिविनायक मंदिर न्यास येथे पर्यवेक्षक म्हणून काम करत असलेले जनार्दन आनंद शिरवाडकर यांच्या न्यादाच्या इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार 'उत्सव पूजा ॲप' या गुगल प्ले स्टोअर ॲपवरून भाविकांकडून ऑनलाईन सिद्धिविनायक पूजा घरपोच प्रसादाच्या नावाखाली ७०१ रुपयांपासून २१ हजार एक रुपये घेऊन फसवणूक केली जात होती. त्यामुळे मंदिराने तक्रार दिल्याने बोगस अशा उत्सव ॲपच्या अज्ञात व्यक्तीवर दादर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


पोलिसांनी अशी केली कारवाई - ॲपवर पैसे भरलेल्या महिलेच्या गुगल पे या ट्रांजेक्शनची माहिती घेतली. त्यानंतर महिलेला पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आलेल्या मोबाईल नंबरचे पोलिसांनी विश्लेषण केले. बोगस उत्सव ॲपच्या जीमेलचे गुगल वरून प्राप्त माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले आणि या तपासात कोलकत्ता पश्चिम बंगाल मधील चार आरोपी असल्याचे तपासात उघड झाले.


Press note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या