Ticker

6/recent/ticker-posts

मोठ्या भावाने दिली छोट्या भावाच्या हत्येची सुपारी

कुलाबातील घटना, भावासह व्यावसायिक सुपारी किलरला अटक


मुंबई, दि. २७ : लहान भाऊ जास्त मोठेपणा करत असल्याचा रागात मोठ्या भावाने हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार कुलाबा पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे. कुलाबा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी मोठ्या भावासह इतर चार जणांना अटक केली आहे.


या हल्ल्यात नागपाडा परिसरातील इम्रान युनूस नमकवाला (वय, ४०) जखमी झाले आहेत. कुलाबा पोलिसांनी इमरान यांचा मोठा भाऊ इरफान युनूस नमकवाला (वय, ४५) याच्यासह इस्लाम अस्लम कुरेशी, सलीम मन्सूर शेख, व्यावसायिक सुपारी किलर लोकेंद्र उदयसिंग रावत उर्फ लौकी उर्फ रॉकी उर्फ साजन सिंह उर्फ थापा उर्फ नेपाळी (वय, २८), इरफान युनूस नमकवाला (वय, ४५) या चौघांना अटक केली आहे.


३१ जुलै रोजी इमरान हे मित्र तारिक सोबत त्यांच्या कारने रीगल जंक्शनच्या दिशेने जात असताना दुपारी दोनच्या सुमारास गाडीच्या चाकाची हवा चेक करण्यासाठी जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी थांबले असता त्यांच्या मागावर असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने सपासप वार केले.


पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी केली असता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांनी फिल्मी शिवडीतून इस्लाम याला अटक केली. त्याच्या चौकशीतून सलीम आणि रावतला अटक केली. रावत हा सुपारी किलर असून त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, हत्येसारख्या गुन्ह्यात शोध सुरू आहे.


पोलिसांच्या चौकशीत इमरान याचा मोठा भाऊ इरफान यानेच सत्तेची सुपारी दिल्याचे समोर येताच त्यालाही अटक करण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या