Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस असल्याचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्यास अटक

तोतया पोलिसास अटक       

 

 फिर्यादीचे नाव - किशन कुमार बसवराज हल्ली, वय 21 वर्षे, व्यवसाय- नोकरी, रा.ठी. - रूम नंबर 60, मल्लिकार्जुन सोसायटी, भवन्स कॉलेज जवळ, गिल्बर्ट हिल रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई.


गुन्हा घडला तारीख वेळ - दि.10/08/2023 रोजी 13.00 वाजताच्या दरम्यान       

 

 गुन्हा दाखल तारीख वेळ - दि. 10/08/23 रोजी 19:38 वाजता.


घटनास्थळ - एचडीएफसी बँक, आझाद नगर मेट्रो स्टेशन जवळ, जेपी रोड, अंधेरी पश्चिम मुंबई.


हकिगत- नमूद तारीख वेळी व ठिकाणी  यातील फिर्यादी यांना तीन इसमांनी पोलीस असल्याचा बहाणा करून बोलण्यात गुंतवून फिर्यादी यांचे बॅग मधील एक लाख रुपये रक्कम घेवून फसवणूक केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला.


तपास - सदरचा गुन्हा नोंद होताच मा. वपोनि यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकासह रवाना होऊन  नमूद घटनास्थळ वरून सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त केले असता सदर फुटेज मध्ये फिर्यादी यांची फसवणूक करणारा एक इसम हा मुंबई, नवी मुंबई, ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे मधील अभिलेखा वरील आरोपी नामे फिरोज फय्याज खान. राहणार आंबिवली, कल्याण असल्याचे निष्पन्न झाले.


डी एन नगर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनी राकेश पवार. यांना गुप्त बातमीदार तर्फे माहिती प्राप्त झाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा आंबिवली रेल्वे स्टेशन परिसर येथे येणार आहे सदर बातमीची खात्री करून माननीय वरिष्ठांच्या परवानगीने डी.एन. नगर पोलीस ठाण्याचे दोन्ही गुन्हे प्रकटीकरण पथक व गुन्हे प्रकटीकरण अधिकारी हे गुप्त बातमीदार यांच्याकडून प्राप्त माहिती नुसार आंबिवली रेल्वे स्टेशन परिसर येथे पोचले असता पाहिजे आरोपी  फिरोज फय्याज खान. हा त्या ठिकाणी असलेल्या एका सलोन मध्ये दाढी करत असताना मिळून आला त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने अटक टाळण्यासाठी प्रतिकार केला असता त्यास सौम्य बळाचा वापर करून पोलीस पथकाद्वारे ताब्यात घेऊन डी.एन. नगर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले व त्याच्याकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याचा सदर गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली. तपासा दरम्यान नमूद अटक आरोपिताकडे चौकशी केली असता विलेपार्ले पोलीस ठाणे येथील एक गुन्हा उघडकीस आला तसेच आरोपिताने अश्याच प्रकारचे गुन्हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे हद्दीत केले असल्याचे कबुली पोलिसांना दिली आहे.


 आरोपिताचा अभिलेख:-

आरोपी नामे फिरोझ फय्याज खान. याचे वर मुंबई, ठाणे, नवी मुंबई. पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे येथे पोलीस बतावणी चे एकूण 35 गुन्हे नोंद आहेत.


 उघडकीस आलेले गुन्हे:-

1) डी.एन. नगर पोलीस ठाणे - गु.र. क्र. 484/2023 कलम 170, 420, 34 IPC


2) विलेपार्ले पोलीस ठाणे - गु.र. क्र. 531/2023 कलम 420, 34 IPC


 हस्तगत मालमत्ता- तपासा दरम्यान हस्तगत करीत आहोत.


 अटक आरोपी इसमाचे नाव:- फिरोझ फय्याज खान, वय-६२ वर्ष, व्यवसाय-काही नाही, रा.ठी. - अबू तालिब मस्जिद च्या बाजूला, इंदिरा नगर, आंबिवली रेल्वे स्टेशन lच्या बाजूला, आंबिवली पश्चिम, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे.


 मार्गदर्शन:-

श्री शशिकांत माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, डी एन नगर विभाग.

श्री मिलिंद कुरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डी.एन. नगर पोलीस ठाणे.

श्री वाहिद पठाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) 


 तपास अधिकारी :- सपोनि राकेश पवार.


 तपास पथक:- 

सपोनि. राकेश पवार, 

पोउपनि. नायकवडी,

पोहवा 12776/पवार , 

मपोह 747/पेडणेकर,

पोहवा 960193/पाटील,

पो ना 061093/दुगाने,

पोशि 080554/पांढरे

पोशि 090155/बाबर,

पोशि 091578/वरे,

पोशि 092525/मेहेत्रे,

पोशि 113153/लाडे,

पोशि 133662/पटेल.

अशी माहिती डी एन नगर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुरडे यांनी दिली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या