Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस पत्नी, मुलींनी बांधली पोलीस आयुक्तांना राखी !

वरळीमध्ये पोलीस परिवाराकडून अनोखे रक्षाबंधन 

दि. २८/०८/२०२३

मुंबई, दादासाहेब येंधे  : पोलीस परिवाराच्या वतीने काल रविवारी वरळीच्या मराठा हायस्कुलच्या शाळेत रक्षाबंधनाचा  अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात पोलीस परिवाराचे कुटुंबप्रमुख पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना ओवाळून पोलिसांच्या पत्नी आणि मुलींनी रक्षाबंधन केले. 

रक्षाबंधनानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिसांच्या पत्नी आणि मुलींशी संवाद साधून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, तुमचे पती किंवा पत्नी हे सणासुदिला मुंबईच्या रस्त्यावर असतात. संस्काराची जबाबदारी पत्नींवर किंवा पतीवर असते. मुलांना वाचनासोबत व्यायाम आणि व्यवहार ज्ञानही शिकवा. या तीन सूत्रांच्या आधारावर हि मुले कुठलेही संकट निभावून नेऊ शकतात, असा सल्लाही त्यांनी दिला. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या