गुन्हे शाखा कक्ष-७ ची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई, दि. १ : विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या करणार असल्याचे सांगून एका तरुणाने पोलीस आयुक्त कार्यालयासह बँक कार्यालय, प्रसारमाध्यमे यांच्या २०० पेक्षा जास्त ई-मेल आयडीवर ई-मेल केला. पोलिसांनीच या ईमेलच्या आधारे तरुणाचा शोध सुरू केला. अखेर विक्रोळीतून या तरुणाला ताब्यात घेतले. नोकरी गेली त्यात कर्जाचे हफ्ते फेडणे शक्य नसल्याने तो गुगलवर डेथ इंजेक्शनचा शोध घेत असल्याचेही समोर आले. गुन्हे शाखेच्या कक्ष-७ ने वेळीच शोध घेतल्याने तरुणाचे प्राण वाचले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा