पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदारांना दिला परत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, ८ जानेवारी, २०२३

demo-image

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदारांना दिला परत

  सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

०८/०१/२०२३

मुंबई, दादासाहेब येंधे : महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने शनिवार दि.०७/०१/२०२३ रोजी रेझिंग डे निमित्ताने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनात पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

IMG-20230107-WA0019


सदर मुद्देमाल परतीच्या  कार्यक्रमावेळी १४ तक्रारदारांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या हस्ते १) सोन्याचे दागिने किंमत अंदाजे  रु. ३००,०००/-, २) नऊ मोबाईल फोन -३,३२,०००/-, ३)दोन मोटारसायकल-१,३०,०००/-, ४) एक लॅपटॉप - ३०,०००/- असे   एकूण -  ७,९२,०००/-  रुपयांचा हस्तगत मुद्देमाल परत देण्यात आला.

IMG-20230107-WA0016


सदर मुद्देमाल परतीच्या कार्यक्रम पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सांगळे , मुद्देमाल कारकून, पोलीस हवालदार,  गोपनीय शाखेचे पोलीस सहाय्यक, पोलीस निरीक्षक मंगेश साळवी आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमावेळी तक्रारदार यांनी त्यांचा चोरी झालेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल परत दिल्याबद्दल  सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पोलीस हवालदार मल्लिकार्जुन बिराजदार यांनी विशेष मेहनत घेतली आहे. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली आहे. 

IMG-20230107-WA0022


%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%80%20%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87,%20%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *