स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
मुंबई, दि. ८ : मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून सदर कार्याकामासाठी सर्व लोहमार्ग पोलीस ठाणे यांनी भरभरून साथ देत उत्साहाने उपक्रम राबवले. सदर रेल्वे पोलीस ठाणे यांना रेल्वे स्टेशन, बाहेरील परिसर तसेच शाळा, महाविद्यालये येथे जाऊन 'हर घर तिरंगा' या उपक्रमा बाबत जनजागृती करण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्या आदेशाला अनुसरून विविध पोलीस ठाणे यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून अभियानास हातभार लावला.
पनवेल रेल्वे पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छ करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला व हर घर तिरंगा चे फलक लावण्यात आले.
दादर रेल्वे पोलीस ठाणे यांनी दादर रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रा लगत असणाऱ्या आर.एम.भट महाविद्यालय परेल येथे महाविद्यालयातीलमुलांकरिता सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम तसेच मुलींच्या सुरक्षितते बाबत व्याख्यान आयोजित करण्यात आले.तसेच शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांना हर घर तिरंगा अभियानाचे पत्रक वाटप करण्यात येऊन प्रत्तेकाने आपल्या घरी तिरंगा लावण्याबाबत आव्हान करण्यात आले.
वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवाच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थीसाठी पोलीस ठाणे भेट हा कार्यक्रम राबविण्यात आला. अभिनव वनमाळी प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल या शाळेतील १०० विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पोलीस ठाण्यातील सर्व शाखा (क्राईम, सायबर, गुन्हे प्रकटीकरण , संगणक, शस्रागार,एल आय बी, सी सी ती एन एस, मुद्देमाल या शाखांना भेट देऊन पोलीस ठाणे कामकाजाविषयी माहिती दिली तसेच पोलीस ठाणे मधील शास्राविषयी माहिती देण्यात आली व हर घर तिरंगा अभियाना बाबत माहिती देण्यात आली.
पोलीस आयुक्त लोहमार्ग अंतर्गत पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
१) आज दि ८/०८/२०२२ रोजी मुख्यालय घाटकोपर येथे स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवाचे भव्य चीत्रीकरण रांगोळीच्या मध्यामाद्व्यारे साकारण्यात आले.
२) उद्या दि ०९ /०८ /२०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “कर्तव्य चित्रकला स्पर्धा” चिमुकल्या भारतीयांना आपल्या देशाबद्दल वाटणारा अभिमान त्यांच्या निरागस कलेतून दाखवण्याची संधी देण्यात येणार आहे.
३) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत हर घर तिरंगा / ध्वज याविषयक लेख/कविता मागविण्यात येत आहेत सदर लेख/कविता यांचे प्रकाशन कर्तव्य या मासिकाच्या आजादी का अमृत महोत्सव या आवृत्ती मध्ये होणार आहे.
४) दि.२७/०७/२०२२ ते दि १४ /०८/२०२२ रोजी ७५ कि.मी. धावणे स्पर्धेचे आयोजन केले आहे.
५) तसेच दि १४ /०८/२०२२ रोजी सायकलिंग या स्पर्धेचे हि आयोजन कारण्यात आले आहे.





0 टिप्पण्या