सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे समोरील परिसरात महीला पोलिसांनी काढली मनमोहक रांगोळी
मुंबई, दि. ११ : आज ११/०८/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते ४.०० वाजेपर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने वपोनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे व पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर यांचे उपस्थितीत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे समोरील परिसरात रांगोळी साकारणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर रांगोळी साकारणे कार्यक्रमाकरीता पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
पोलीस ठाणे समोरील रांगोळी प्रदर्शनाला रेल्वे प्रवाशी यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. ए. इनामदार यांनी दिली आहे.



0 टिप्पण्या