१ मेपर्यंत राज्यात जिल्हा आणि शहर बंदी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

demo-image

१ मेपर्यंत राज्यात जिल्हा आणि शहर बंदी

कडक लॉक डाऊनची अलबजावणी, लोकल, मेट्रो सरकारने ठरवून दिलेल्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच

मुंबई : राज्यात कडक निर्बंध लागू करूनही गर्दीवर नियंत्रण येत नसल्याने कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने राज्य सरकारने गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आता दोन जिल्ह्यांमध्ये म्हणजेच आंतरजिल्हा प्रवास करण्यास तसेच दोन शहरांदरम्यान प्रवास करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 

यापूर्वी लग्नसमारंभासाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली होती. आता केवळ २५ जणांच्या उपस्थितीत आणि दोन तासातच लग्न उरकावे लागणार आहे. भाजीपाला डेअरी किराणामालाची दुकाने ही आधी जाहीर केल्याप्रमाणे सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू राहतील. मात्र, त्यांना नंतरही घरपोच सेवा देण्याची परवानगी असेल.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी २२ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून ते २ मे सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. आंतरजिल्हा व आंतर शहर प्रवासाचे निर्बंध कठोर केले असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी कडक लॉकडाऊन जाहीर करणार होते. मात्र, नाशिकमध्ये ऑक्सीजन गळती प्रकरणामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा जनसंवाद टाळला, आणि लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीने मदत व पुनर्वसन विभागाने जारी केल्या असे सांगण्यात आले आहे.

006+Dadar

Break+The+Chain+order+dtd.+21st+April%252C+2021_page-0001

Break+The+Chain+order+dtd.+21st+April%252C+2021_page-0002

Break+The+Chain+order+dtd.+21st+April%252C+2021_page-0003

Break+The+Chain+order+dtd.+21st+April%252C+2021_page-0004

Break+The+Chain+order+dtd.+21st+April%252C+2021_page-0005


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *