मुंबई : बोरिवली परिसरात बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट११ ने अटक केली आहे.
आरोपी पिस्तूल आणि दारूगोळा विकण्यासाठी दहिसरच्या कुंदननगर परिसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (ता. १९ ) परिसरात पोलिसांनी सापळा रचत तेथे आरोपी येताच त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चार देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. तसेच, हे पिस्तूल व काडतुसे बाळगण्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी आदित्य ठक्कर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीने पिस्तूल कुठून आणले होते तो कोणाला विकणार होता, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे.
प्रेस नोट
0 टिप्पण्या