Ticker

6/recent/ticker-posts

ब्रँडच्या बोगस मालाच्या विक्रीप्रकरणी व्यापाऱ्याला अटक

मुंबई : पिटीलाईट कंपनीच्या फेव्हीक्कीक या ब्रॅडच्या बोगस मालविक्री करुन ग्राहकांसह कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी एका व्यापाऱ्याला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. 


हनुमान प्रकाण गुप्ता असे या आरोपीचे नाव असून त्याच्या कुर्ला येथील कारखान्यातून पोलिसांनी दोन मशीनसह बोगस मालाचा दहा लाख एकोणीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध स्वामीतत हक्कांचे उल्लघंन बोगस माल तयार करुन त्याची विक्री करुन ग्राहकासह कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. साकिनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिडीलाइट कंपनीच्या फेव्हीक्कीक या नामांकित ब्रॅडची हुबेहुब नकल करुन बोगस मालाची विक्री होत असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी एसीपी महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्या पथकाने कुर्ला येथील कारखान्यात छापा टाकला होता


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या