मुंबई, दि.२८ : पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कल्व्हर्टचे काम सुरू असताना मुलुंड जकात नाका, हरिओम नगर येथे जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात २९ मार्चपर्यंत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले.
रस्त्याच्या कामात महानगरपालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागल्याने गळती लागली आहे. त्यामुळे आजपासून पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱ्या या जलवाहिनीच्या गळता दुरुस्तांचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. ही दुरुस्ती बुधवार २९ मार्च रोजी रात्री १०पर्यंत तीन दिवस सुरू राहणार आहे. याचा परिणाम या पूर्व उपनगर व शहर विभागातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
शहर विभाग -
'ए विभाग : संपूर्ण निभाग,
बी विभाग : संपूर्ण विभाग,
ई विभाग : संपूर्ण विभाग,
एफ/दाक्षिण विभाग : संपूर्ण विभाग,
एफ/उत्तर विभाग : संपर्ण विभाग

0 टिप्पण्या