Ticker

6/recent/ticker-posts

जी. के. मैत्री कट्टयातर्फे सामाजिक उपक्रम

मुंबई, दादासाहेब येंधे :  विरार, पूर्व  येथे १५ वर्षापूर्वी एका जागेवर "मराठा लाइफ फाउंडेशन " ह्या नावाने अनाथाश्रम उभारले गेले.  आज घडीला ह्या अनाथाश्रमात वृद्ध आई-वडील, मानसिक त्रास झालेल्या व्यक्ती, लहान बेवारस मुलं-मुली, रस्त्यावर बेवारस राहणारे, मंदबुद्धी, अंध व्यक्ती, अशा एकूण १९० व्यक्ती राहतात. ह्या आश्रमात नशा मुक्ती केंद्र ही आहे. येथे सर्व सेवा नि:शुल्क आहे. ह्या संस्थेत मानवतेची सेवा केली जाते, माणूसकी जपली जाते. काही सामाजिक संस्था आणि समाजातील इतर दानशूर व्यक्तिमत्वाच्या लोकांच्या सहकार्यामुळे हे अनाथाश्रम चालत आहे. 


दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक उपयुक्त आहे. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो, जो स्वत:ला विसरुन इतरांना आनंदीत करतो. म्हणून जी. के. मार्ग शाळेच्या मैत्री कट्टाच्या सामाजिक उपक्रमाद्वारे, अतुल्य सेवा संस्थेमार्फत, ह्या अनाथाश्रमात "अन्नदान " करण्याचे ठरविण्यात आले आहे. ह्या आश्रमाला काही जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे, ते अतुल्य सेवा संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.  अन्नदानात, तांदुळ, तुर डाळ, मुग डाळ, मसूर डाळ, काळे चणे, काबुली चणे, शेंगदाणे, पीट, पोहे, रवा, लोणचं, कांदे, बटाटे, सोयाबीन वडी, तेल, खोबरेल तेल, सर्फ, आंघोळीचा साबण, साखर, चहा पत्ती, बिस्किट, फरसाण, हळद पावडर, लाल मिरची पावडर, राई, लसून, जीरा, धने पावडर, बेड शीट आणि इतर गरजेची सामग्री देण्यात येणार आहे. जुने कपडे म्हणजे जसे साडी, शर्ट, टी शर्ट, पॅन्ट, हाफ पॅन्ट आणि इतर कपडे, पण कपडे मात्र चांगले धुऊन आणावेत आणि स्वत: विरारच्या आश्रमात घेऊन यावेत असे आवाहन कट्ट्यातर्फे करण्यात आले आहे.


आश्रमाला भेट देण्याचा कार्यक्रम रविवार दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी सुट्टीच्या दिवशी ठेवण्यात आला आहे. अशी माहिती जी के मैत्री कट्ट्याचे सदस्य नरेश चितकेली तसेच जयप्रकाश केळकर यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या