अंमली पदार्थ विरोधी पथकाची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई, दादासाहेब येंधे : व्यसनांच्या आहारी जाऊन ड्रग्ज तस्करीकडे वळलेल्या २३ वर्षीय झाहिद याला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. सदर कारवाई आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. या कारवाई २३ लाख रुपयांचे ११५ ग्रॅम एमडी ( मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईत वाढणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे तोडण्याकरता अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमांचा एक भाग म्हणून आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी राजेंद्र दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्त घालत होते. त्यावेळी मानखुर्द परिसरातील लल्लुभाई कंपाउंड येथे एक तरुण संशयास्पद रित्या आढळून आला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एमडी आढळून आले. एमडी बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी जाहीद याला अटक केली आहे.

त्याला न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

0 टिप्पण्या