मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात भारतीय संविधानाचे महत्त्व नरेंद्र पांगे आणि अनिल घाडीगांवकर यांनी मुलांना समजावून सांगितले. लहान मुलांच्या उपस्थितीत झेंडावंदन साजरा करण्यात आला.
झेंडावंदन झाल्यानंतर लहान मुलांनी गाणी तसेच डान्स सादर केले. उत्कृष्ट गाणी तसेच डान्स सादर केलेल्या मुलांना भेटवस्तू देण्यात आली. सदर कार्यक्रमास भाई मयेकर, लक्ष्मण देवरुखकर, विनोद मकवाना, सुनील डीचोलकर, राकेश जेजुरकर, निकेश जाधव, संतोष सकपाळ, प्राची कदम, संतोष कदम, प्रसाद सावंत, सत्यवान नर आदी कार्यकर्ते तसेच लहान मुले मोठया संख्येने उपस्थित होते.
व्हिडिओ पहा...👇
0 टिप्पण्या