Ticker

6/recent/ticker-posts

कारचे सायलेन्सर चोरणाऱ्या पाच जणांना अटक

भंगार विक्रेतेही अटकेत

मुंबई, दादासाहेब येंधे : गुन्हे शाखेतील प्रॉपर्टी सेलच्या अधिकाऱ्यांनी  कारचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन भंगार विक्रेत्यांसह पाच जणांना अटक केली आहे.

मुंबई शहर परिसरात नजिकच्या कालावधीत एका विशिष्ठ कारचे (मारती ईको)सायलेन्सर चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या.

सदरबाबत मालमत्ता कक्षाच्या पथकाने गॅरेजवाले, अभिलेखावरील आरोपींकडे केलेल्या चौकशीत समजुन आले की, कारच्या सायलेन्सर मध्ये असलेल्या कॅट्लेटीक कर्न्व्हटरस्मध्ये मौल्यवान दुर्मिळ धातू - प्लॅटेनियम, पॅलेडिअम, रोडिअम असतात व ते मिळविण्यासाठी सायलेन्सरची चोरी केली जाते. हे सायलेन्सर रु. १२,०००/- ते १५,०००/- प्रति नग भंगाराल्यास विकले जातात. पुढे ते कापुन त्यातून मेटल डस्ट काढून त्याची रु. ५,०००/- ते ६,०००/- प्रति १० ग्रॅम दराने विकी केली जाते. त्यातही मारुती इको कारचा ग्राउंड क्लीअरन्स जास्त असतो व त्याचा सायलेन्सर सहजतेने काढता येत असल्याने याच कारच्या सायलेन्सरची चोरी होते. त्यासंदर्भात मुंबई शहरातील विविध पो. ठाणेत गुन्हे दाखल झाले होते.

त्याबाबत मालमत्ता कक्षाचे पथकाने गोपनियरित्या माहिती प्राप्त करुन वडाळा येथे भंगार विकेत्याकडे सदर चोरीचे सायलेन्सर विकीकरीता आरोपी इसम येत असल्याची माहिती प्राप्त करुन सापळा रचुन चोरी करणारे ०३ इसम व चोरीचा माल खरेदी   करणारे ०२ भंगार विकेते अशा एकुण ०५ जणांना ताब्यात घेतले. तपासात त्यांनी आतापर्यंत ३५ ते ४० सायलेन्सर चोरी करुन नमूद भंगार विक्रेत्यास विकल्याचे कबुल केले. सदर भंगार विकेत्याने ते कापून त्यातील मेटल डस्ट काढून पुढे विकी केल्याचे सांगितले आहे.

अली रजा छोटेमिया उर्फ नदीम, दीपक वाघमारे, अल्ताफ शेख, मोहम्मद शेख, जुबेद रहेमान अशी आरोपींची नावे असून त्यांना मालमत्ता कक्ष कार्यालयात आणून कौशल्यपूर्वक कसून चौकशी केली असता त्याचा बृहन्मुंबई मध्ये एकुण २० गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत.

नमूद आरोपींचा अंगझडती पंचनामा व वैद्यकीय तपासणी करुन त्यांना पुढील कायदेशीर कारवाई करीता अँन्टोप हिल पो. ठाणेच्या ताब्यात देण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा. मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुकत (गुन्हे), मा. विरेश प्रभु, अपर पोलीस आयुक्‍त(गुन्हे), मा. प्रकाश जाधव, पोलीस उप आयुक्‍त (प्रकटीकरण) यांचे मार्गदर्शनाखाली मा. शशांक सांडभोर, सहाय्यक पोलीस आयकुत (डी स्पेशल) यांच्या निगराणीखाली मालमत्ता कक्ष, गु.प्र.शा., मुंबई या कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, सपोनि सचिन कदम, पो.उप.नि. गादेकर, साळुंखे, सपोफौ काळे, पो.ह. उमेश राऊत, प्रकाश भंडारे, पो.ना.अरूण सावंत, चिंतामण इरनक, अमित वसावे, सचिन सावंत, मेंगेश जगझाप, पो.शि. जाधव, धुळदेव कोळेकर, तसेच पोनाचा किरण जगदाळे, पोशिचा. शरद मुंकुदे, गायकवाड यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे.












प्रेस नोट


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या