मुंबई : मुंबई पोलीस दलातील १८ पोलीस उपायुक्तांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यात मुंबईत बदली करण्यात आलेल्या ५ पोलिस उपायुक्तांना नियुक्ती देण्यासोबत तात्पुरत्या नियुक्तीवर असलेल्या ६ आणि सध्या कार्यरत असलेल्या ७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच पोलिस उपायुक्त श्याम घुगे यांना सशस्त्र पोलीस मरोळ येथे तात्पुरती नेमणूक दर्शविण्यात आली होती. त्यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश नंतर काढण्यात येणार आहेत. असे पोलीस मुख्यालयाने स्पष्ट केले आहे.
0 टिप्पण्या