मुंबई : कोरोना काळात बंद असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय राणीबाग सोमवार १ नोव्हेंबर पासून नियमित वेळेनुसार पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे.
पर्यटकांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांकरिता सकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत प्राणिसंग्रहालय खुले राहणार आहे.
कोरोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे पालिकेने टप्प्याटप्प्याने मुंबई शहर व उपनगरातील उद्याने नागरिकांसाठी खुली केली आहेत. आता सोमवारपासून राणीबागही पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. मात्र, प्राणिसंग्रहालयातील तिकीट की सायंकाळी ५.१५ दररोज सकाळी ४ वाजता बंद करण्यात येणार आहे.
दिवसभरात अथवा सुट्टीच्या दिवशी कोणत्याही वेळेस प्राणी संग्रहालयामध्ये जास्त गर्दी झाली असल्याचे निदर्शनास आल्यास प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वार पर्यटनाकरिता बंद करून तिकीट विक्री थांबविण्यात येईल, असे पालिकेच्या उद्यान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान जेष्ठ नागरिक व ५ वर्षांखालील लहान मुले यांनी प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
0 टिप्पण्या