Ticker

6/recent/ticker-posts

क्रांती रेडकर हिचे उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई : समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नवाब मलिक यांच्या कडून केल्या जात असलेल्या आरोपांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिले आहे. 

रोज सकाळी आमच्या अब्रूची लक्तरे चारचौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या प्रतिष्ठेचा खेळ करून ठेवला आहे, असे रेडकर हिने आपल्या पत्रात म्हटले आहे. आज बाळासाहेब ठाकरे असेल तर त्यांना हे नक्कीच आवडले नसते. त्यांची सावली, त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्याच बघतो. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायच्या अपेक्षेने पाहते. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती या अभिनेत्रीने पत्रात केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या