मुंबई, दादासाहेब येंधे : तुमच्या घरात घोर संकट येणार असल्याचे सांगून त्याचे निवारण करण्याच्या बहाण्याने नागरिकांना तृतीयपंथी बनून लुटणाऱ्या भामट्याला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जीतूभाई जव्हरभाई परमार (वय ३७, रा. गांजीपाडा, वसई) असे त्याचे नाव आहे.
गेल्या वर्षी पंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गारोडिया नगर मध्ये राहत असलेल्या दानाभाई पटेल यांच्या घरी हा जितूभाई तृतीयपंथी बनून आला होता. घराबाहेर काळी फुल्ली मारून त्याने तुमच्यावर घोर संकट आले आहे असे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. पाण्याच्या ग्लासमध्ये थोडी मिरची आणि मीठ घालून आणा. असे त्याने घरातील सदस्यांना सांगितले. त्यानंतर त्याने ते पिऊन टाकून आपले संकट पिऊन टाकले असे सांगितल. त्यानंतर घरातील कुटुंबियांच्या अंगावरील प्रत्येकी एक असा सोन्याचा दागिना एक रुमालामध्ये ठेवण्यास सांगून तो चार रस्ता येथे ठेवण्यास सांगितले व परत घेऊन जाण्यास सांगितले. अशा पद्धतीने बोलण्यात गुंतवून हातचलाखी करून ते सोने घेऊन पळ काढला होता. याबाबत पटेल कुटुंबाने पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. पंतनगर पोलिस आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना तो मुलुंड नवघर मध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. पंतनागर पोलीसांनी या ठिकाणी सापळा रचून या अट्टल ठगाला बेड्या ठोकल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल वाघमारे आणि पथकाने या आरोपीला शिताफीने अटक केली आहे.
0 टिप्पण्या