राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, २१ जून, २०२१

राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

मुंबई, दादासाहेब येंधे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आयोजित योगवर्गात सहभागी होत योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला.
योग इन्स्टिट्युटच्या जनसंवाद प्रमुख मीना नल्ला, मुख्य प्रशिक्षिका पूजा हेलिवाल तसेच प्रशिक्षक अमर पांधी यांनी यावेळी राज्यपालांसह उपस्थितांना योगासने सांगितली.
सांताक्रूझ, मुंबई येथील द योग इन्स्टिट्युटया संस्थेच्या अध्यक्षा हंसा जयदेवा यांच्या मार्गदर्शनाखाली योगवर्गाचे आयोजन करण्यात आले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर खबरदारी घेण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज