Ticker

6/recent/ticker-posts

रिक्षावर झाड पडून एकजण जखमी

ठाण्यात रिक्षावर झाड कोसळून चालक जखमी

नौपाडा दमानी इस्टेट येथे आज दुपारी रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत रिक्षाचे नुकसान झाले असून रस्त्याच्या कडेला उभा असलेला जयराम यादव हा दुसऱ्या रिक्षाचा चालक जखमी झाला आहे.

ठाण्यातील नौपाडा दमानी इस्टेट परिसरातील दत्तमंदिर येथे काही रिक्षा रांगेत उभ्या असताना एक सुकलेले झाड अचानक कोसळले. दरम्यान, तेथे उभ्या असलेल्या रिक्षांपैकी आर. तिवारी यांच्या रिक्षावर झाड पडल्याने त्या रिक्षाचे नुकसान झाले आहे. तसेच रिक्षा सोडून उभा असलेला नवी मुंबईतील रिक्षाचालक जयराम यादव (३५) हा देखील यामध्ये जखमी झाला. त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या