व्यापाऱ्यांच्या बंदमुळे देशभरातील मालवाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईतील ट्रक टर्मिनसवर मोठ्या संख्येने ट्रक उभे करण्यात आले होते.
जीएसटीतील त्रुटी तसेच ई-वे बिल प्रणानीतील जाचक अटींविरुद्ध
व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला मुंबई महानगर क्षेत्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नवी मुंबईहून भाजीपाल्याची आवक कमी झाल्याचा फटका भायखळा, कुर्ला येथील भाजीपाला बाजाराला बसला. तसेच फुलांची आवकही दादरच्या बाजारात काही प्रमाणात घेतल्याचे चित्र होते.

0 टिप्पण्या