यंदा अभ्यासक्रमाला कात्री
पहिली ते बारावी पर्यंतच्या पाठ्यक्रमात २५ टक्के कपात
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा आतापर्यंत शाळा बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांतील इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
ऑनलाइन माध्यमातून विविध शाळांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणामधील विविध अडचणी व
विद्यार्थ्यांवर पडणारा ताण याचा विचार करून हा निर्णय घेतला असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधक परिषदेच्या संचालकांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याची माहिती राज्य शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी संकेतस्थळ www.maa.ac.in


0 टिप्पण्या