Ticker

6/recent/ticker-posts

गृहमंत्र्यांनी घेतली शांताबाई यांची भेट

गृहमंत्र्यांनी घेतली शांताबाई यांची भेट
पुणे, दादासाहेब येंधे : पुणे येथे राहणाऱ्या शांताबाई पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तो महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहोचला. 
याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो मी पहिला आहे. आजींचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली, म्हणून आज मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी आलो आहे. तसेच अनेकाकांकडून मला ८५ वर्षांच्या आजींची जगण्याची कसरत समजली. त्यांना भेटून मला उर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. दरम्यान एक लाख रुपये व नऊवारी साडी-चोळी देऊन देशमुखांनी आजींचा सत्कार केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या