Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनामुक्तीनंतरच शाळा सुरू व्हाव्यात

कोरोनामुक्तीनंतरच शाळा सुरू व्हाव्यात
पालकांच्या मनात धास्ती
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून शाळाही आजपर्यंत बंद आहेत. पुनश्च: हरिओम म्हणत लॉक डाऊन निर्बंध शिथिल करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे.  महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्याभरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही तेथे शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सरकारने जारी केल्या आहेत. मुंबईसह विविध महानगरांत शाळा सुरु करणे चाचपणी सुरू आहे. मुंबईतील स्थिती नियंत्रणात येत असली तरी महामुंबईत मात्र रुग्ण संख्या वाढत असल्याने कोरोनाची दहशत कायम असून या संकट काळात सुरू शाळा सुरु करण्यास पालकांचा स्पष्ट विरोध आहे. देशपातळीवर ऑनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या 'लोकल सर्कल' या प्रथितयश संस्थेने पालकांची भूमिका जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यात शाळांमधील नियमित पद्धतीचे शिक्षण कधी सुरू करावे या प्रश्नावर पालकांनी आक्रमक प्रतिक्रिया नोंदवल्या. कोरोना मुक्तीनंतरच शााळा
सुरू कराव्यात असे मत नोंदवले गेले.
शाळा सुरू झाल्या तर विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घरात आजी-आजोबा, आत्या तसेच इतर सदस्यही आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. कोरोना संकटामुळे बऱ्याच कुटुंबांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. त्यामुळे ते पैसा जपून खर्च करत आहेत.
देशात राज्यात कोरोना रुग्णांचा चढता आलेख व मुंबईत स्थिती नियंत्रणात येत असली तरी १ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्यास ९७% पालकांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत 'लोकल सर्कल'ची पाहणी जरी मुंबई झाली असली, तरी राज्यातील पालकांची हीच भूमिका असल्याचे तज्ञांचे मत आहे. केवळ शहरातच नव्हे तर भोवतालचा २० किलोमीटरच्या परिसरात १००% कोरोनामुक्त झाल्यानंतरच २१ दिवसांनी शाळा सुरू कराव्यात असे बहुसंख्य पालकांचे मत आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा सुरू करण्याबाबत घेतलेल्या आढाव्यानंतर महाराष्ट्राबाबत मात्र अद्याप निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या