Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस

तुमच्या शुभेच्छा कोविड योद्ध्यांना समर्पित
मुंबई, दि.२६ दादासाहेब येंधे : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कार्यालय किंवा मातोश्री निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा देण्याचा आग्रह कोणीही करू नये. वाढदिवसाला पुष्पगुच्छ ऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा. या संकटात जन आरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझमादान यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जनतेच्या शुभेच्छा मी कोरोना योद्ध्यांना समर्पित करतो. अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करू नये. त्याचप्रमाणे जाहिरात हलकी लावू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या